saafl info about ITR 1 |
प्रत्येक व्यक्तीला ITR भरणे आवश्यक आहे.
ITR साठी वर्षातून एकदा हा केलेला खर्च कामाला येतो.
कर्जासाठी
कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक दस्तऐवज म्हणून
वापरला जातो.
लहान व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल, टपरी, इतर
छोटे मोठे व्यावसयिक यांचा उत्पन्नाचा स्त्रोत पुरावा म्हणून ही उपयोगात येते. जर
एखाद्या कडे मागील ३ वर्षाचे ITR असतील तर त्याला कर्ज लवकर व कमी कागदपत्रात
मिळते. तसेच व्याजदर ही माफक मिळतो. याचाच अर्थ हा आहे कि व्याज सवलत सुद्धा मिळू
शकते.
पत्ता पुरावा
आपण जर पारपत्रासाठी (पासपोर्ट)
आवेदन करत असाल तर आयटीआर हा रहिवाशी पत्ता पुरावा म्हणून ही स्वीकारलो जातो. हा रहिवाशी पत्ता पुरावा म्हणून शासन मान्य पुरावा आहे.
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी याचा उपयोग आहे. क्रेडिट कार्ड औषध म्हणून वापरला तर त्यासारखी मदत ही हीच आहे. उधार-उसन वार करण्यापेक्षा
आणि दुसर्या कडे हात पसरण्यापेक्षा स्वत:च्या क्रेडिट वर केलेली उलाढाल ही नेहमीच श्रेष्ठ असते. असे हे क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर वेळच्या वेळी आयटीआर
भरले असेल तर विनासायास आपल्याला क्रेडिट कार्ड मिळते.
उत्पन्न दाखला
ज्यांच्या कडे उत्पन्नाचा निश्चित सोर्स नाही किंवा बर्या
पैकी फक्त रोखीचा
व्यवहार करतात त्यांच्या उत्पन्नाचा दाखला म्हणून ही आयटीआर ला उपयोगात आहे. बर्याच शासकीय योजनेत सुद्धा
हा वापरात येत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ,
इतर मागसवर्गीय उन्नती महा मंडळ सारख्या योजनेचा लाभ घेताना आयटीआर विचारात घेतले जात
आहे.
महिलांच्या हक्क
अजूनही बर्याच संपत्ती ला फक्त पुरूषांचेच स्वामित्व आहे. त्यामुळे महिलांना स्वत:चा संपत्तिक स्वामित्व दाखला आज रोजी उपलब्ध नाही. पण वेळच्या वेळी भरलेले स्वत:चे
आयटीआर हे महिलांच्या आर्थिक आणि संपत्तिक दाखला म्हणून आज उपयोगात आणला
जात आहे. नवर्याचे आयटीआर आहे म्हणून बर्याच सुशिक्षित महिला आज ही आयटीआर भरायला टाळाटाळ करतात, पण हे त्यांचे अज्ञान आहे. स्वत:चा आर्थिक सोर्स-स्त्रोत म्हणून किमान
आयटीआर महिलांनी आज रोजी भरणे गरजेचेच आहे.
नुकसान निर्देशन
धंदा व्यवसाय यातील झालेला तोटा किंवा नुकसान निर्देशित किंवा अग्रेषित करण्यासाठी आयटीआर शासन दरबारी मांडू शकता. त्यातून
व्याज, कर आणि लाभ याबतीत सवलत मिळू शकते.
अपघात विमा क्लेम
अपघातात झालेल्या जीवित हानीचे मूल्यमापण करण्यासाठी नेहमीच आयटीआर ला विचारात घेतले जाते. त्यामुळे बाकी कशासाठी नाही पण स्वत:च्या जीवित मूल्यमापनसाठी तरी नियमित आयटीआर भरणे
गरजेचे आहे. इथे आणखीन एक विचारात घेणे
जरुरीचे आहे की, त्या व्यक्तीची जरी कोणतीही विमा पॉलिसी नसली तरीही
नुकसान भरपाई साठी आयटीआर विचारात घेतले जाते. नैसर्गिक किंवा व्यक्तिकार्मिक अपघातातील
नुकसान मूल्य मापन
होत असते. त्यासाठी आयटीआर विचारात घेतात.
विमा जोखीम (समअश्युर्ड)
विमा जोखीम चाचपण्यासाठी-तपासण्यासाठी आणि निश्चित
करण्यासाठी आयटीआर विचारात घेतले जाते.
व्हिसा
एकेकाळी परदेश
गमन क्वचितच होत असे. त्यामुळे व्हिसा आणि इमिग्रेशन या सारख्या बाबी सर्व सामान्य व्यक्तीला दुरापास्त होत्या. पण आज सहल, अभ्यास दौरा, व्यवसाय नोकरीनिमित्त देशाटन वाढले आहे. आज इमिग्रेशन प्रोफाइल साठी आणि व्हिसा मिळविण्यासाठी
सुद्धा आयटीआर विचारात
घेतले जाते. त्यामुळे आज कधी ना कधी कशाच्या
ही निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. आमच्या कडे असे बरेच क्लायन्ट आहेत
की त्यांना तिकीट व सर्व राहण्या-खाण्याचे पॅकेज असून सुद्धा फक्त व्हिसा मिळालेला
नाही म्हणून लाखो रुपयांच्या संधीवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे अशी संधि
कधी ही आपले दार ठोठावू शकते त्यासाठी तुमच्या कडे आयटीआर असणे गरजेचे आहे.
सरकारी टेंडर
जर आपण व्यवसाय करत असाल असाल
किंवा ठेकेदार असाल आणि आपल्याला सरकारी टेंडर मिळवायचे असेल तर आपल्या कडे आयटीआर
असणे गरजेचे आहे. कारण टेंडर भरताना तुमची पतमांनाकन करणे साठी आयटीआर उपयोगात आणले
जाते. जर आपल्याकडे सर्व काही असूनही जर आयटीआर नसेल तर तुमची अवस्था “लक्ष्मी
आली द्यायला आणि पदर नाही घ्यायला” अशी गत होऊ शकते. त्यामुळे अशा टेंडर मध्ये कधी ही
नशीब चमकू शकते, पण नशिबाला कॅश करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक दस्तएवज
असणे गरजेचे आहे.
TDS टीडीएस
वेळोवेळी पगार आणि बिलातून
कापला गेलेला टीडीएस परतावा मिळवायचा असेल तर तो फक्त तुम्ही आयटीआर द्वारेच परत मिळवू
शकतात. आपण जादाचा किती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर सरकार ला जमा केला आहे. हे समजून त्याचा परतावा घेणे साठी आयटीआर चा उपयोग होतो.
सरकार सहानभूत
आपण जर वेळेवर कर भरणा करत असाल आणि काही तांत्रिक अडचणी किंवा कारणामुळे
आपल्याला दंड लागला असला आणि
त्याची नाहक भरावा लागत असेल तर आपण शासनाला विनंती करून सरकारी सहानभूतीचा
लाभ मिळवून दंड कमी
किंवा रद्द बदल करू शकता.
तळटीप : या लेखातील बाबी या फक्त महितीसाठी
असून प्रत्यक्ष सरकारी बदल आणि धोरण यानुसार बदल संभवू शकतात.
©अमरसिंह राजे MA, Phd. (appear)
लेखक आर्थिक
विषय आणि आंतरराष्ट्रीय लघु उद्योगाचे अभ्यासक असून विविध आंतरराष्ट्रीय व्यवसायिक
संघटनाशी जोडलेले आहेत. तसेच “सफल
रूरल फायनशियल लिटरेसी
मिशनचे” संस्थापक आणि प्रवर्तक आहेत.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा