Featured Post

एमएसएमई म्हणजे काय ?

एमएसएमई म्हणजे काय ? Micro अत्यंत लहान यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक 1 कोटींपेक्षा जास्त नसावी आणि वार्षिक उलाढा...

२७ नोव्हें, २०१९

Home Loan गृहकर्जासाठी अर्ज करताना लागणा-या कागदपत्रांविषयी माहिती…



स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी अपरिहार्य ठरणा-या गृहकर्जासाठी अर्ज करताना लागणा-या कागदपत्रांविषयी माहितीशहरी भागात घरे घ्यायचं असेल, तर बहुतेकांना कर्जाशिवाय दुसरा पर्याय नसतो. अर्थात गृहकर्ज मिळवणं घर शोधण्याइतकंच त्रासदायक होऊ शकतं हा अनेकांचा अनुभव आहे. अगदी पाच मिनिटांत गृहकर्ज अशा अनेक जाहिराती सध्या दिसत असल्या तरी या कंपन्यांनाही ठराविक कागदपत्रं लागतातच. त्यामुळे गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी त्यासाठी साधारण कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते याची आपण माहिती करून घेऊ…!!
मासिक उत्पन्न किमान १५००० च्या पुढे एकूण कौटुंबिक उत्पन्न २५०००० च्या पुढे असणे ते बँकेच्या अकौंट वर दिसले पाहिजे.

नोकरदारांसाठी पगारपत्रक अर्थात सॅलरी स्लिप
ü  व्यावसायिकांसाठी व्यवसायातील उत्पन्न दाखवणारी कागदपत्रे
ü  बँक स्टेटमेंट
ü  वयाचा दाखला
ü  निवासाचा दाखला किंवा तत्सम प्रमाणपत्र
ü  नोकरीचा पुरावा
ü  गुंतवणुकीसंबंधी माहिती
अत्यावश्यक कागदपत्रं
Ø  बिल्डरकडून घर खरेदी करताना घर खरेदीसाठी केलेलं करारपत्र
Ø  बांधकाम करण्यात येणा-या जागेचा सातबारा किंवा मालमत्ता नोंदणी कार्डची छायाप्रत
Ø  बांधकाम केलेली जमीन शेतजमीन नसल्याचं (एनए असल्याचं) पत्र
Ø  मागील 3० वर्षाचा सर्च अँड टायटल रिपोर्ट
Ø  बिल्डरचं जागेच्या मालकाशी झालेलं करारपत्र
Ø  नागरी जमीनधारणा कायद्यांखालील नोटिशीची एक प्रत
Ø  सरकारी अधिका-यांनी बिल्डिंग प्लॅनला मंजुरी दिलेल्या प्रमाणपत्राची छायाप्रत
Ø  बिल्डिंग पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र
नोकरदारांसाठी
v  सॅलरीस्लिप/फॉर्म१६अ
v  बँक खात्यात झालेल्या मागील सहा महिन्यांतील व्यवहारांचं स्टेटमेंट
v  रेशन कार्डाच्या पहिल्या आणि अखेरच्या पानाची छायाप्रत किंवा पॅन कार्ड/टेलिफोन बिल/विजेच्या बिलाची छायाप्रत
v  गुंतवणुकीसंबंधी माहिती असलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रती उदा. मुदत ठेवींचं प्रमाणपत्र,शेअर्स किंवा इतर कोणतीही गुंतवणूक विमा पॉलिसी काढली असल्यास त्याचीसर्टिफिकेट्स किंवा त्यांच्या नुकत्याच भरलेल्या प्रिमियमच्या पावतीची छायाप्रत फोटो

व्यावसायिकांसाठी

§  व्यवसायाची थोडक्यात माहिती
§  व्यवसायातून झालेल्या नफा/तोटय़ाच्या लेखापरीक्षकाकडून केलेल्या लेखापरीक्षणाची प्रत
§  आगाऊ कर भरला असल्यास त्याची छायाप्रत (आवश्यक असल्यास)
§  व्यवसायाच्या नोंदणी प्रमाणपत्राची छायाप्रत
§  बचत खात्याचं मागील सहा महिन्यांतील व्यवहारांचं स्टेटमेंट
§  याअगोदर घेतलेल्या कर्जाची माहिती असलेलं प्रमाणपत्र
न टाळता येणारी कागदोपत्री पडताळणी :
ü  ७/१२ चा दाखला, सूची क्रमांक १ व २, गाव नमुना ८ अ मध्ये असलेली संबंधित घराची, प्लॉटची नोंद सारखीच असायला हवी.
ü  संबधित जागेसाठी भरलेली कर पावती, खरेदीखत तसेच ७/१२ च्या दाखल्यावरील नाव हे सारखेच असावे.
ü  मोकळी जमीन असेल तर त्याचा शेतसारा व्यवहाराखेपर्यंत भरला असावा. ही माहिती तलाठी कार्यालयातील दाखल्याद्वारे करता येते.
ü  सदर जागेवर कोणतीही कायदेशीर कार्यवाही अथवा न्यायालयीन खटला तर नाही ना, याची खातरजमा करावी.
ü  घेऊ पाहणाऱ्या जागेवर शाळा, महाविद्यालय, मैदान, रुग्णालय, देवस्थान आदी आरक्षण नाही ना हेही पडताळून पहावे.
ü  काही जागा या ठरावीक उद्देशाने राखीव असतात. त्यात बदल करूनही त्याची खरेदी होऊ शकत नाही.
ü  जागेसाठी असलेला वा भोवताली रस्ता आहे किंवा नाही, तो असल्यास किती सोडला आहे, हे तपासून पहावे.
ü  संबंधित इमारतीची एनओसी, ओसी, कन्व्हेअन्स, सीसी आदींची पूर्तता झाली आहे का, हेही पहावे.

मंजुरीसाठी किमान वेळ

१ महिना अंदाजे. सर्व कागदपत्राची पूर्तता असेल आणि सिबिल ओके असेल तर एका  दिवसातच कर्ज मंजूर होते.*

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा